अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान; भरपाई देण्याबाबतची मागणी ; आ.दीपक केसरकर…

सावंतवाडी

मार्च महिन्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसा मुळे फळबागांचे नुकसान झाले यासंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दीपक केसरकर यांनी विधानसभेत लक्ष वेधले आहे.अवकाळी पावसा मुळे फळ बागायतदार, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याकडे आमदार दीपक केसरकर यांनी अधिवेशनात सभापतींचे लक्ष वेधले.कोकणात अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे आणि याचा फटका फळ पिकांना बसत आहे. आंबा, काजू, कोकम, जांभूळ आदी फळ पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोकणात येणाऱ्या अवकाळी पाऊस, चक्रीवादळ येऊन फळ बागा नष्ट होत आहेत. त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबतची मागणी आमदार केसरकर यांनीकेली आहे.