ब्युरो न्यूज कोकणशाही
देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर जखमी अवस्थेतच मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले, तेथे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर, महत्त्वाची बैठक असल्याने ते पुढे नाशिककडे रवाना झाले आहेत. दरम्यान, मंत्री महोदयांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांचे कार्यकर्त्यांची काहीवेळ धांदल उडाली होती.









