महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा….

सावंतवाडी,

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंबोली येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राला भेट दिली. नियोजित कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी त्यांनी थोडासा वेळ काढून या ठिकाणी होत असलेल्या उसाच्या संशोधनाबद्दल माहिती जाणून घेतली . तसेच “ए.आय.” तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय किंवा संशोधन करता घेत येईल ? याची चर्चा वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांबरोबर केली. यावेळी सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब प्रांताधिकारी हेमंत निकम तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.