सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्गनगरी येथील पालकमंत्री कक्षात ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचे काम सुरू झालं असून जनतेचे प्रश्न जागच्या जागी सोडविण्याकडे मंत्री राणे यांचा कल लागला आहे, जनता दरबारात भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यात येत असून नागरीकांमध्ये तात्काळ समाधान बघायला मिळत आहे , या जनता दरबारात जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींची उपस्थिती होती.










