मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही
सलग सात दिवसांच्या वाढी नंतर आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ७२८ अंकांनी घसरून ७७,२८८ वर बंद झाला, तर निफ्टी १८१ अंकांनी घसरून २३,४८६ वर बंद झाला. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली असून तो ३९८ अंकांनी घसरून ५१,२०९ वर बंद झाला. बाजारातील सर्वाधिक विक्री आयटी आणि रिअल्टी क्षेत्रात दिसून आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगला प्राधान्य दिले. भारतीय कंपन्यांच्या मार्च तिमाही निकालांमध्ये काही कंपन्यांचे आर्थिक परिणाम कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही बाजार घसरण्याची शक्यता आहे. ‘बाय चायना, सेल इंडिया’ हा ट्रेंड पुन्हा सक्रिय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनी शेअर्सच्या तुलनेत भारतीय शेअर्स महाग झाले असून परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मळवाट स्वीकारल्याने बाजारावर दबाव वाढला आहे.










