आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर साधला निशाणा…

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो निर्मला सीतारमण यांच्यावरील विडंबनात्मक कविता वाचून दाखवताना दिसत आहे. याआधी एकनाथ शिंदेंवरील त्याच्या विडंबनात्मक गीतामुळे राज्यात नवा वाद उद्भवला होता. या गीतेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली होती. मात्र त्याबद्दल माफी मागणार नसल्याचं म्हणत कुणाल सोशल मीडियावर दररोज एक व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. मंगळवारी त्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता कुणाल कामराने सीतारमण यांच्या बद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.“आपका टॅक्स का पैसा हो रहा है हवाहवाई इन सडकों की बर्बादी, करने सरकार ये आयी मेट्रो है इनके मन मैं, खोद कर ये ले अंगडाई ट्रॅफिक बढाने ये है आयी, ब्रिजेस गिराने है ये आयी कहते है इसको तानाशाही”, अशी उपरोधिक कविता त्याने वाचून दाखवली आहे.