श्री ब्रम्हदेव मंदिरात २७ मार्च रोजी महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ…

देवगड :

देवगड तालुक्यातील कोर्ले येथे असलेल्या श्री ब्रम्हदेव मंदिरात २७ मार्च रोजी श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले आणि वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड आणि कोर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ’ या धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञामध्ये २०० ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे, अशी माहिती श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्लेचे अध्यक्ष सुधीर रानडे यांनी दिली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभघेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.या दिवशी दुपारी ३ ते ६:३० या वेळेत महारुद्र जपाभिषेक होईल. सायंकाळी ६:३० ते ७ दरम्यान महाआरती आणि मंत्रपुष्पाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ७ ते ७:३० या वेळेत मान्यवरांचे मनोगत त्यानंतर सायंकाळी ७:३० ते रात्री ९ दरम्यान महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात थाला याने भागा संस्कती आणि परंपरांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम एक सुवर्णसंधी ठरणार आहे