ब्युरो न्यूज कोकणशाही
दुचाकी अपघातात १७ दात तुटल्याने निराश झालेल्या एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच कर्नाटकातल्या चिकमंगळूर शहरात घडली आहे. तो आयआयटीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. आयआयटीमध्ये दुचाकीवरून जात असताना झालेल्या एका रस्ते अपघातात तो जोरात तोंडावर आपटल्याने गंभीर जखमी झाला होता. दात तुटल्याने रुमालाने चेहरा लपवत त्याला फिरावे लागत होते. तसेच, डेंटिस्टकडे उपचारांसाठी सतत जावे लागत असल्याने व यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने तो तणावाखाली होता.










