कुडाळ
वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घर परिसरातील काजू बागेला रविवारी दुपारी १ वा. च्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. ठाकुर यांच्या घरातही या आगीच्या ज्वाला घुसून कपडे जळून खाक झाले. सुदैवाने स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्यज्ञाने मोठी दुर्घटना टळली. तालुक्यात ठिकठिकाणी बागायती, जंगल, परसबागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी दुपारी वेताळबांबर्डे पावणाई टेंब येथे अचानक आग लागली. या आगीच्या ज्वाला वाऱ्याने खिडकीतून ठाकूर यांच्या घरात गेल्या. यात कपडे जळाले. स्थानिक नागरिक भाऊ मेस्त्री, जयवंत गावडे यांनी तत्काळ धाव घेत आग विझविल्याने पुढील दुर्घटना टळली. ही घटना समजताच उपसरपंच प्रदीप गावडे, शैलेश घाटकर, दिलीप तिवरेकर, पिंटू वेताळ बांबर्डे दळवी, रमण गावडे, नागेश गोडकर, सर्पमित्र प्रसाद गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीत काजू कलमांचे नुकसान झाले.










