ब्युरो न्यूज कोकणशाही
मुंबई – गोवा महामार्गावर रविवारी २३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरणाऱ्या बलकर ट्रेलरने ट्रक व मोटारीला दिलेल्या धडकेत आठजण जखमी झाले आहेत. गोव्याहून मुंबईच्या दिशेने रविवारी २३ रोजी सकाळी घाट उतरणाऱ्या बलकर ट्रेलरचा चालक मलिक अयुब यमन अप्पा काझी (३२) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे घाटात रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला बलकर ट्रेलरची जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रक दरीत कोसळला. दरीत कोसळलेला ट्रक हा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने नादुरुस्त होऊन रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्यानंतर बलकर ट्रेलरची पुढे जाणाऱ्या मोटारीला धडक बसली. ट्रेलर चालक व मोटारीतून प्रवास करणारे प्रवासी रामशेखर शन्नपा मगणी (२६), संस्कृती संतोष कदम ( ४२), जागृती वैभव शिंदे (३५), शोभा सदानंद कदम (६०), सामिष एकनाथ कदम (५१), मयुरी सदानंद कदम जयराम वैभव सुर्वे (१४) (सर्व रा.चिपळूण) हे जखमी झाले. त्यांना श्री नरेंद्र महाराज संस्थान व श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकेतून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.










