रत्नागिरी
रत्नागिरीत गांजा घेऊन येणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई रविवार, २३ मार्च रोजी सकाळी सांगली फाट्यावर करण्यात आली. यातील संशयिता कडून ९ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.सत्यजित जाधव (३४, रा. विकासनगर, इचलकरंजी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी संशयित हा बसमधून प्रवास करीत होता.मात्र, पोलिसांनी बस अडवून गांजासह त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. संशयित जाधव हा लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने बेरोजगार होता. तो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो गांजा घेऊन रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती पोलिस अंमलदार सागर चौगले यांना प्राप्त झाली होती. त्यांनी पोलिस निरीक्षक कळमकर यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी एक पथक सांगली फाट्याजवळ तैनात केले होते.










