महावितरणाचं दुर्लक्ष; शॉक सर्किटने लागली आग….

मडुरा-डिगवडी मडुरा – डिगवडी येथे शॉर्टसर्किटने आग मात्र, आग लागू नये यासाठी महावितरणने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास स्पार्किंग होऊन गवताला आग लागली. बांधाहून मडुराच्या दिशेने येणाऱ्या झोळंबे माजी सरपंच श्री. गवस यांनी आग लागल्याची माहिती स्थानिकांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाण्याचा वापर मडूरा येथे स्पार्किंग होऊन लागलेली आग विझवताना डिगवाडीकरून आगीवर नियंत्रण मिळविले. डिगवडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र महावितरणने याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.मडुरा हायस्कूल नजीक डीपीजवळ दरवर्षी स्पार्किंग होऊन बागायतीना आग लागण्याचे प्रकार घडत असतात.माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, बाबा बुगडे, सागर धुरी, उत्तम वालावलकर यांचा समावेश होता.याठिकाणी दरवर्षी स्पार्किंग होऊन आग लागते. मात्र आग लागू नये यासाठी महावितरणकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. याबद्दल प्रकाश वालावलकर आक्रमक झाले. त्यांनी जोपर्यंत घटनास्थळी कनिष्ठ अभियंता येत नाही तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करू नका असे वायरमनला सांगितले. सायंकाळी उशिरा कनिष्ठ अभियंता आर. जी. ठाकूर घटनास्थळी दाखल झाले होते.