पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरआत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू…

ब्युरो न्यूज कोकणशाही

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) रविवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू झाला. एका बलूच बंडखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक लष्करी ताफ्यात घुसवून स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेच इतर बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांवर सशस्त्र हल्ला चढविला. या गोळीबारात सर्व सैनिकांना ठार मारल्याचा दावा बीएलएने केला आहे. जाफर एक्स्प्रेसच्या अपहरणानंतर आठवडाभरातच पाकिस्तानी लष्करावर बलूच बंडखोरांनी केलेला हा दुसरा मोठा आघात ठरला. बलूच बंडखोरांकडून आठवडाभरात दुसऱ्यांदा लक्ष्य आठ बसेसमधील सर्व सैनिकांना ठार केल्याचा दावा . लष्कराचा ताफा क्वेट्टाहून तफ्तानकडे निघाला होता. बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतानाच ९० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. सैनिकांच्या एका बसला बलुचिस्तानातील नोशकी जिल्ह्यात हा हल्ला आयईडी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली, तर दुसऱ्या बसला आरपीजीने लक्ष्य केले. या ताफ्यात एकूण सात बस व दोन वाहने होती. बंडखोरांनी या बसना घेरून त्यातील सर्व सैनिकांना ठार केल्याची माहिती बीएलएचा प्रवक्ता जीयांद बलूचने दिली. खुरासान डायरीच्या वृत्तात या हल्ल्यात ७ सैनिक ठार आणि ३५ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर, ड्रोनसह मोठी कुमक तैनात केली आहे. पोलिसांनी पाकिस्तानी बीएलएचा दावा खोडून काढत रस्त्याकडेला पडलेल्या एका बॉम्बचा स्फोट झाला, त्याचवेळी सैनिकांना घेऊन जाणारी बस तेथून जात होती. यात पाच सैनिकांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. असल्या भ्याड हल्ल्यांमुळे दहशवादाच्या विरोधातील आपला निर्धार डळमळीत होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानी सैनिकांवर आठवडाभरातच झालेला हा तिसरा हल्ला असून, याआधी मंगळवारी क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस अपहरण करण्यात आले होते. यात २८ पाकिस्तानी सैनिक, तसेच ३३ बंडखोरांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. तर बलुचिस्तानात पाकिस्तान सैन्यावर झालेल्या हल्लात अनेक सैनिक जखमी झाले. २१४ सैनिकांना ओलिस ठेवल्याचा तसेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही बलुची बंडखोरांनी केला आहे.