दापोली
दापोलीकरांवर पाणी टंचाईचे सावट असून एकीकडे काटेकोर नियोजन तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.
आपले नळ कनेक्शन तोडणे अपेक्षित आहे का ?
हा कटू प्रसंग टाळण्यासाठी नगरपंचायतीचे थकित व घरपट्टी, नळपट्टी, गाळाभाडे ताबडतोब भरा. अश्या आशयाचं फलक सध्या दापोलीत चर्चेत आहे, दापोलीतील अनेक समस्या दापोली नगरपंचायतने सुधाराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नियम लावा पण सुविधा पण द्या अशी मागणी दापोलीकरांनी केली आहे. दापोलीच्यानागरिकांना पिण्यासाठी पाणी वेळेत सोडून नगरपंचायतने सहकार्य करावे अशी दापोलीच्या नागरिकांची मागणी आहे. दापोली शहराला नारगोली व कोडजाई येथील नळपाणी योजनेतून दिवसाला सुमारे 20 लाख लिटर पाणीपुरवठा केला जात असून वाढत्या तापमानामुळे या साठयात दिवसेंदिवस घट होऊ लागली असून यामुळे दापोलीकरांवर पाणी कपातीचे संकट लागले आहे










