पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक ; तारापोरवाला मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप मिळणार

मुंबई –

तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्त्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपयोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, तारापोरवाला मत्स्यालय मुंबईचे आकर्षण आहे. याला आधुनिक स्वरूप दिल्यास पर्यटन वाढीस मदत होणार आहे. तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाह्य यंत्रणेद्वारे सहायक जिल्हा पर्यटन सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी विशेष अनुदान हवे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊसला खाजगी भागीदार यांचा समावेश करून चालविण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात यावा. यासाठी एका गेस्ट हाऊस वर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावे, अशी मागणी मंत्री श्री. राणे यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष अनुदान देऊन विकास करण्यात यावा, असेही श्री. राणे यांनी सांगितले. आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण वेंगुर्लेत करा
आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी मंत्री श्री. राणे यांनी पर्यटन विभागाकडे केले असून पर्यटन मंत्री यांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.
अधिकाऱ्याची तत्काळ नेमणूक करण्यात यावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर शौचालय, लाईफ गार्ड ची सुविधा देण्यात यावी, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पर्यटन वाढीला मदत होणार आहे.