माटणे येथे मातीसाठ्यावर महसूलची दंडात्मक कारवाई केली.

दोडामार्ग,

माटणे येथे पत्रकारांना वृत्तांकन करण्यापासून रोखणाऱ्या बाप-लेकाला महसूलने चांगलाच दणका दिला आहे. तब्बल ८१ ब्रास माती साठा जप्त करून संबंधित जमीन मालक रामचंद्र विनायक तेली यांना २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत ही दंडाची रक्कम भरावयाची आहे.
शिवाय या माती साठ्यातील मातीचे काही नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आल्याचेही प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी सांगितले. या कारवाईने गौण खनिज तस्करांचे धाबे चांगले दणाणले आहेत.
रामचंद्र तेली यांचा खुलासा महसुलने अमान्य करत ‘त्या’ माती साठ्यावर दंडात्मक कारवाई केली. मुदतीत दंडाची रक्कम भरणा न केल्यास आपल्या विरुद्ध फौजदारी कारवाई करून या रकमेचा बोजा सातबारावर चढविण्यात येईल असे नोटीसीत नमूद केले आहे.
रस्त्यालगतच्या साठ्यावर संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच कारवाई का केली नाही? अशी विचारणा करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशी मागणी पत्रकारांनी परिविक्षाधीन प्रांताधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्याकडे केली होती. याची दखल घेत तलाठी व मंडळ अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
या नोटिसीला उत्तर देताना तलाठी यांनी म्हटले आहे, तो मातीसाठी कदाचित त्याच दिवशी केला असावा.
नसल्याचे नमूद करत यापूर्वी साठा करण्यात आला असता तर पोलीस पाटील यांनी निदर्शनास का आणून दिले नाही? असे उत्तर देत तलाठ्यांनी सर्व जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर झटकली आहे.