वादळी वारे आणि तापमान वाढीमुळे आंबा, काजू पिकाला फटका…

जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस जोरदार वादळी वारे वाहत असून, सरासरी तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. याचा फटका आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली काजू बी व आंब्यांचा खच पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तीव्र उष्णतेमुळे काजू, आंबा फळे गळत असल्याने शेतकरी चिंतेत पीक करपून गेले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी हतबल झाला आहे.
जिल्ह्यात गेले काही दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. सरासरी ३८ ते ४० डिग्री तापमानाची नोंद होत आहे. या तीव्र उष्णतेने आंबा, काजूचा मोहर व कोवळी फळे करपून जात आहेत. या संकटात आणखी भर म्हणून गेले दोन-तीन दिवस पहाटेपासून जोरदार वादळी वारा सुटत आहे. सकाळी साधारणपणे ११ वा. पर्यंत सह्याद्री पट्ट्यातील गावांना जोरदार वादळाचा सामना करावा लागत आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेली काजू बी ची घळ.
सिंधुदुर्गचा पारा ४० अंशांवर तापमान १० मार्चपर्यंत वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा
जनतेने योग्य ती काळजी घ्यावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला असून, १० मार्चपर्यंत जिल्ह्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा-मुंबई यांनी वर्तवली आहे. तरी नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या दृष्टीने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आंब्याला उष्णतेसह वादळी वाऱ्याचा फटका
या जोरदार वादळामुळे काजूची कोवळी बी, तसेच कैरी मोहर गळून पडला आहे. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, आखवणे, मौदे, करूळ, कुंभवडे नावळे, सड्रेरे, आचिर्णे, खांबाळेसह अन्य गावांना या वादळाचा तडखा बसला आहे. अचानक आलेल्या या दोन दोन संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सिंधुदुर्गचा पारा ४० अंशावर आवाहन हवामान खात्याने केले आहे. नजीकच्या काळात वाढते तापमान पाहता ग्रामीण व शहरी भागात कामानिमित्त फिरणाऱ्या नागरिकांनी दुपारच्या सत्रात फिरणे टाळावेयोग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या होत्या दरम्यानच्या सहा ते दहा मार्च या कालावधीत जिल्ह्यात वाढते तापमान लक्षात घेता जनतेने उष्णतेची योग्य ती खबरदारी घ्या असेही आवाहन केले आहेयासाठीसर्व नागरिकांनी खालील प्रमाणे योग्य ती काळजी घ्यावी.