प्रदूषणमुक्त प्रवास आणि पैशांचीही बचत;सिंधुदुर्गात धावणार एसटीच्या १५० ‘सीएनजी बसेस !

प्रदूषणमुक्त प्रवास आणि पैशांचीही बचत करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात राज्यातील एक हजार एस. टी. बसेस सीएनजी गॅसवर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी ठाणे आणि रायगड विभागात सीएनजी बसेस सुरू करण्यात आल्या असून, आता सिंधुदुर्गातही सीएनजी बसेस लवकरच धावणार आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले या तीन आगारांचा समावेश करण्यात आला असून, या आगारांच्या प्रत्येकी ५० बसेसचे सीएनजीमध्ये परिवर्तन केले जाणार आहे.
ठाणे येथील कंपनीकडे या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तनासाठी पाठविण्यात येत असून, दोन सीएनजी बसेस सिंधुदुर्गात दाखलही झाल्या आहेत. तुर्तास खासगी पंपांवर या बसेसमध्ये सीएनजी भरला जाणार
असून, लवकरच तिन्ही आगारांमध्ये स्वमालकीचे गॅस पंप उभारले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे यंत्र अभियंता (चालन) सुजित डोंगरे यांनी दिली.
प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने एसटी महामंडळाच्या बसेस सीएनजीवर चालवाव्यात, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी शासन, एसटी
एमएनजीएल कंपनी पुरविणार सीएनजी सिंधुदुर्गातील सीएनजी एस. टी. बसेसना एमएनजीएल कंपनी सीएनजी पुरविणार आहे. यासाठी कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले डेपोमध्ये गॅस पंप उभारले जाणार आहेत. तुर्तास खासगी पंपांवर सीएनजी भरले जाणार आहे. त्याचे भाडे महामंडळ देणार आहे. सीएनजीमध्ये रूपांतरित केलेल्या बसेस रस्त्यावर धावण्यासाठी योग्य आहेत की नाही, याबाबतची चाचणी होणार आहे. तसेच चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग विभागातील तीन डेपोच्या बसेस सीएनजीवर धावण्यासाठी सज्ज होत असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. महामंडळाला निधी उपलब्ध करून देणार आहे. डिझेलचे दर वाढत असल्याने खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना एसटी महामंडळाची तारेवरची कसरत होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात जर सीएनजी बसेस आणल्या तर डिझेलवर होणारा खर्च कमी होवून पैशांची बचत होणार आहे. डिझेल आणि गॅसचे दर पाहिले असता डिझेलच्या तुलनेत गॅसचा दर १५ ते २० रुपयांनी कमी आहे. सिंधुदुर्गात लवकरच कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले या तीन आगारांच्या प्रत्येकी ५० म्हणजेच १५० बसेस सीएनजीमध्ये रुपांतरित केल्या जाणार आहेत. एका बसमध्ये १२० किलो सीएनजी भरण्याची क्षमता असते. साधारणपणे ४.३ प्रति कि.मी प्रमाणे एकदा सीएनजी भरलेली एसटी बस सुमारे ५०० कि.मी.चा प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागासह कोल्हापूर, रत्नागिरी या मार्गावरील प्रवासासाठी या बस वापरल्या जाणार आहेत.
सध्या असलेल्या एसटीच्या बसेस ज्यांचे सध्याचे आयुर्मान सध्या साडेसात ते आठ वर्षापर्यंत आहे, अशा गाड्या १५ वर्ष आयुर्मानापर्यंत सीएनजीसाठी वापरल्या जाणार आहेत. एका बसचे सीएनजी बसमध्ये
परिवर्तन करण्यासाठी २८ टक्के जीएसटी धरून १४ लाख ५८ हजार एवढा खर्च येतो. हा खर्च राज्य शासन उचलणार आहे. यासाठी ठाणे येथील बालाजी एंटरप्रायझेस आणि इको फ्युएल या कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. सात वर्षे ही कंपनी त्यांचा मेंटेनन्स करणार आहे.
शासनाने यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातही या बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग विभागातील मालवण आणि विजयदुर्ग वगळता उर्वरित सर्व आगारांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. कुडाळ आणि वेंगुर्ले आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. अर्थात इलेक्ट्रिक बसेस सिंधुदुर्ग विभागाला कधी मिळणार? हे मात्र प्रश्नचिन्ह आहे.
सिंधुदुर्ग विभागात सप्टेंबर २०२२ मध्ये ४२० एसटी बसेस होत्या. सध्या त्यातील केवळ ३४० बसेस राहिल्या आहेत. लवकरच विभागाच्या ताफ्यात २० गाड्या येतील, अशी माहिती यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांनी दिली.