मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मच्छीमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत

कुडाळ,

तारामुंबरी ता. देवगड येथे मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या संतोष सारंग या मच्छीमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर यांनी दिली. देवगड येथील समुद्रात मासेमारी करताना सारंग याचा मृत्यू झाला होता. ही घटना २ फेब्रुवारीला घडली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मंत्री राणे यांनी या प्रकरणाची दखल घेतली व संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.