महाकुंभनगर (प्रयागराज)
मोक्षप्राप्तीची आस ठेवत करोडो पावले गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या (गुप्त) संगमाच्या दिशेने वळाली. साधू, संत आणि भाविकांच्या मेळ्याचा हा सागर भवसागराशी एकरूप झाला. मुखी शिवशंभोचा जप अन् ‘त्रिवेणी’तील पवित्र जलधारा यांच्या तादात्मभावाने गंगाकिनारा चिंब झाला. या तल्लीन भावात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर महाकुंभाच्या या पर्वाची सांगता झाली. यंदाचा हा महाकुंभ विशेष महत्त्वाचा. ग्रहस्थितीमुळे हा योग १४४ वर्षांनी जुळून आलेला. पौष पौर्णिमेला म्हणजे १३ जानेवारीला हा भक्तियाग सुरू झाला. त्यात ६६ कोटींहून अधिक लोकांनी पुण्यसंचिताचा लाभ घेतला. साधूंच्या मिरवणुका आणि तीन ‘अमृत स्नानां’ची (शाही स्नान) अनुभूती घेतली. सकाळी सहा वाजेपर्यंतच ४१ लाख भाविकांनी स्नान केले. पहाटे दोनपर्यंतच ११.६६ लाख भाविकांनी संगमात एक डुबकी घेतली होती. पुढच्या दोन तासांत ही संख्या २५.६७ लाखांपर्यं पोहोचली. सहापर्यंत जवळपास दुप्पट संख्या म्हणजे ४१.११ लाख भाविकांनी अमृत स्नानाचा योग अमृतकाळात (पहाटे) घेतला. या स्नानसोहळ्यावर मुख्यमंत्री आदित्यनाथ त्यांच्या निवासस्थानातील नियंत्रण कक्षातून पहाटे चार ‘वाजल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लक्ष ठेवून होते. एक्स अकाऊंटवर योगी लिहितात, ‘महाकुंभ २०२५ प्रयागराजमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाची आराधना करत त्रिवेणी संगमात पवित्र डुबकी मारणाऱ्या सर्व संत, कल्पवासीय आणि भाविकांचे मनापासून त्यांच्यासाठी कुंभनगरापासून राहुट्या बांधून त्यातील सोयीनुसार दर आकारत त्यांच्या निवासाची सोय करत त्यांच्या ‘मोक्ष’ प्राप्तीच्या आराधनेतून स्थानिकांनी लाभ घेतला.
व्हीआयपींचे ‘शाही’ स्नान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० फेब्रुवारीला पवित्र स्नान केले, तर उपराष्ट्रपती जगदिश धनकड यांनी ३ फेब्रुवारीला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारीला स्नान केले. भूतानचे राजे जिग्मे खेसर निमग्याल वांगचूक यांचे त्रिवेणी संगमात शाही स्नान केले.









