सिंधुदुर्ग :
आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, श्रावण गाव प्रमुख श्री. दुलाजी परब (उपसरपंच, ग्रा. पं. श्रावण) यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह हा प्रवेश करून, स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात केली आहे.मा. आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सक्षम मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या निमित्ताने शिवसेनेची ताकद आडवली-मालडी विभागात अधिक बळकट झाली असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.या प्रवेश सोहळ्यात स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वजण जोमाने कार्यरत राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या या प्रवेशामुळे उबाठा गटाला मोठा फटका बसला असून, शिवसेनेचा झेंडा आता अधिक जोमाने फडकणार आहे.
#शिवसेना_सिंधुदुर्ग #संघर्ष आणि सत्तेचीवाटचाल #शिवसेनेचा_वाढता_विस्तार









