दुचाकी व कार अपघातात युवक गंभीर जखमी…

दोडामार्ग, ता. २३ :

मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वंगुली येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान जखमीला तात्काळ तेथील ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.