सावंतवाडी, दि २३
सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुन आता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले. म्हणूनच अशा होतकरु मुलीच कौतुक भाजपा महीला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या वेंगुर्ले शहरातील कलानगर निवासस्थानी जाऊन केले .आज वेंगुर्ला भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कु. किरण मेस्त्रीचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कु.किरण हिचे अभिनंदन आणि कौतुक करतांना, कोंकणातील मुलींसमोर कु. किरण ने आदर्श घालून दिला आहे असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुष्मा प्रभू खानोलकर, यांनी उपस्थितांसमोर विचार प्रगट केले. या प्रसंगी बोलताना भाजपा वेंगुर्ला तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ म्हणाल्या कि कोंकणातील मुली आणि महिला कित्येक क्षेत्रात बाजी मारत आहेत, आता अशा होतकरू मुली आणि महिलांच्या पाठी आपण समर्थपणे उभे राहिले पाहिजे, त्यांना तांत्रिक, आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर यांनी भाजप खऱ्याअर्थाने महिला सक्षमीकरण करत आहे असे सांगितले, या अभिनंदनपर कार्यक्रमाला सरचिटणीस सौ.आकांक्षा परब, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. श्रेया मयेकर व अनुसया मेस्त्री उपस्थीत होत्या.










