सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक प्रथम वर्धापन दिन सोहळा…

सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगड चा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. महिलांमध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पथकाच्या विशेष वादनाने कार्यक्रमाला अतिरिक्त रंगत आणली.

कार्यक्रमाला कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. महेश ताम्हणकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील, कर्मचारी मंगेश मेस्री तसेच कुणकेश्वर हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पथक प्रमुख महिला प्रतिनिधी प्राजोल राणे, सोनाली गावकर तसेच वैष्णवी कदम, पुनम मयेकर, वैदेही प्रभू, तेजस्वी कदम आणि संजना कदम यांनी विशेष मेहनत घेतली.