छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज नगर फलकाचे अनावरण !

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ शहरातील शिवाजी नगर या वाडीला कुडाळ नगरपंचायतीमधील महायुतीच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर केले नामांतर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.शहरातील शिवाजी नगर असे एकेरी नामोल्लेख असलेले वाडीचे नाव बदलण्यासाठी शिवप्रेमी संघटनेने महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांजवळ निवेदन दिले होते मात्र गेली तीन वर्ष त्यांनी या निवेदनावर कोणताही विचार केला नाही दरम्यान सत्तापालट होऊन महायुतीची सत्ता स्थापन झाली यावेळी शिवप्रेमींनी याबाबत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांना सांगितले होते दरम्यान सर्वसाधारण सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करण्यासंदर्भात विषय पत्रिकेवर गटनेता विलास कुडाळकर यांनी विषय ठेवला आणि हा विषय महायुतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर तसेच गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका सौ नयना मांजरेकर सौ. श्रृती वर्दम, चांदणी कांबळी यांनी मंजूर करून तसा ठराव केला. दरम्यान आज (बुधवार) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त या वाडीचे झालेले नामांतर सर्वांना ज्ञात व्हावे म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, संजय भोगटे, शिवप्रेमी रमा नाईक, विवेक पंडित, माजी नगरसेवक राकेश कांदे, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.