कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग शाखेची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी श्री. रणजित हिर्लेकर उपाध्यक्ष पदी डॉ.सोमनाथ कदम तर सचिव पदी श्री. प्रवीण पारकर यांची निवड कोकणच्या इतिहासाच्या साधने संकलित करून आजवर अप्रकाशित राहीलेल्या इतिहासाचे नव्याने संशोधन व लेखन व्हावे यासाठी स्थापन केलेल्या कोकण इतिहास परिषद या संस्थेच्या सिंधुदुर्ग शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण इतिहास परिषदेच्या आजीव सभासदांची सर्वसाधारण सभा कणकवली कॉलेज, कणकवली येथे डॉक्टर प्रकाश बावधनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री. सदाशिव टेटविलकर व सचीव डॉ. विद्या प्रभु या ऑनलाईन उपस्थित होत्या. या सभेत कोकण इतिहास परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी श्री रणजित हिर्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी डॉ. सोमनाथ कदम, सचिव पदी श्री. प्रवीण पारकर, सहसचिव पदी श्री. विनायक जमदाडे, खजिनदार पदी श्री. निलेश सरजोशी यांची निवड करण्यात आली. कार्यकारीणी सदस्य म्हणून प्रा. सचिन दहिबावकर, डॉ.राज ताडेराव प्रा. सुरेश पाटील, श्री मनोहर काजरेकर, डॉ. प्रकाश बावधनकर, सौ ज्योती तोरस्कर, श्री हर्षल नाडकर्णी, डॉ. विलास देऊलकर यांची निवड करण्यात आली.या वेळी श्री. सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या भाषणात कोकण इतिहास परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या भावी वाटचाली विषयी मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग जिल्हातील इतिहास संशोधन व संवर्धनाचे काम सिंधुदुर्ग शाखा जोमाने करील असा विश्वास व्यक्त करून श्री. टेटविलकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन केले.










