सिंधुदुर्ग,
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलजार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे.यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागणी केली होती या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले.अखेर, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.










