रत्नागिरी :
रत्नागिरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रत्नागिरी जिल्हा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी वेळ द्यावा. सिंधुदुर्गात आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि येथे आम्ही सर्व आमदार असूच. आम्ही या निवडणुकांमध्ये तुमच्यापुढे ढाल बनून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आणणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आभार सभेत सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी निधी प्राप्त झाला. मागील निवडणुकीवेळी शिंदे यांच्याबाबतीत विरोधकांकडून वेगवेगळे अपप्रचार करण्याचा प्रयत्न झाला. पैजादेखील लागल्या होत्या. पण आमदार म्हणून आपण स्वतः, आमदार किरण सामंत, मंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारून, विधानसभेत जाण्याचा त्यांच्यावरील विश्वास पक्का ठेवला होता, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.










