सिंधुदुर्गात भाजपाकडून होणार राजकीय भूकंप?

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात आज 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वा. ओरोस येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होतं आहे. या मेळाव्यात सिंधुदुर्ग मधून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. इतर पक्षातून काही मोठे पक्ष प्रवेश या मेळाव्यात होणार आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई आदी नेतृत्वाच्या साथीने हे प्रवेश होणार असल्याचे समजते. त्यामुळे सिंधुदुर्गातील काही विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणामध्ये उलथा पालथ झालेलं चित्र आगामी काळात पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये. इतर राजकीय पक्षांचे काही नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त कोकणशाहीच्या हाती आहे. इतर पक्षातून भाजपात प्रवेश करणाऱ्या मोठ्या प्रवेशाचे चॅलेंज कुणासाठी किती अवघड ठरणार आहे कि राजकीय बांधणीसाठी सोपं होणार आहे हे आज सायंकाळी भाजपाच्या मेळाव्यानंतरचं स्पष्ट होईल.