तिलारी परिसरातील गावात हत्तीचा उपद्रव वाढत चालला आहे सद्या काजू आंबा हंगाम असल्याने गावालगत असलेल्या बागायतीकडे फिरणे मुश्किल होऊन बनले आहे त्यात गावच्या जत्रा असल्याने रात्री उशिरा हत्ती रस्त्यात भेटतात त्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे मोर्ले गावच्या जत्रे अगोदर गावच्या हद्दीवर हत्ती विसावले होते यावेळी मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस यांनी चक्क जंगली हत्तीशी संवाद साधला तो व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला होता तर हेवाळे – बाबरवाडी गावच्या जत्रेला जाणाऱ्या भाविकांना अडवत बाबरवाडी रस्त्यावर पाच हत्तींनी ठाण मांडून बसले होते त्यावेळी बाबरवाडी ग्रामस्थांसह पोलिस पाटील यांना दोन तास थांबवावे लागले होते एकंदरीत हत्तीचा जत्रा प्रवास सर्वाच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे पहिल्यांदा आले तेव्हा गणपती बाप्पा मोरया म्हणूनच स्वागत केले होते त्यानंतर हत्तींनी नुकसान सुरु केल्याने हत्ती बदल तिरस्कार निर्माण व्हायला लागला आहे
तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित झालेल्या बुडित क्षेत्रातील पाणी साठा मोठया प्रमाणात उपलब्ध झाला तसेच नैसर्गिक वन संपदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने खाद्य ही मिळू लागले. त्याच दरम्यान बांबू खाद्य कमी झाल्याने व पाण्याच्या शोधात कर्नाटक राज्याच्या वन जंगलातून हत्ती दाडेली येथून या भागात सन २००२ मध्ये आले त्यांनतर हत्तींचा धुमाकूळ सूरू झाला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हत्ती मोहीम राबविण्याची मागणी करूनही म्हणावी तशी दखल घेतली नाही मात्र दोडामार्ग तालुक्यातील सरपंच संघटना एकत्र येत दोन दिवसांपूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, यांनी दखल घेतल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे या प्रश्नाकडे शासन कशा प्रकारे हाताळत हत्तीचा बंदोबस्त करते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे










