कुडाळ : प्रतिनिधी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा ही संघटना लढा देत आहे. कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न सुटले आहेत, काही प्रलंबित आहेत. ते शासनाकडून सोडवून घेण्यासाठी लढा सुरूच ठेवा. त्यासाठी तुमची असलेली एकजूट अशीच कायम ठेवा. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही माजी आ. वैभव नाईक यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात दिली. तसेच राज्यात लाडकी बहीण योजनेत ५ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांना या योजनेचा परत लाभ मिळवून देण्यासाठी ठाकरे शिवसेना लवकरच राज्यभरात आंदोलन उभारणार आहे, असेही नाईक म्हणाले.
या राज्यस्तरीय अंगणवाडी कर्मचारी अधिवेशनात बोलताना माजी आ. वैभव नाईक. उपस्थित जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, निशा शिवूरकर, अशोक जाधव, कमलताई परुळेकर व अन्य.
अधिवेशनाला राज्यभरातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली,
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद
ट्रेड सेंटर सभागृहात पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन माजी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.










