वृत्तसेवादिल्ली
मुरादाबाद येथे नुकत्याच झालेल्या द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिऍलटी शो मध्ये कुडाळच्या पि.के.डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ यांच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ या डान्स क्लासच्या पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड करण्यात आली होती. संस्थापक व प्रशिक्षक प्रसाद कमतनुरे यांच्या नेतृत्वाखाली सुमन चव्हाण, कनका परुळेकर, श्रुतिका परब, जानवी पावसकर व चैत्रा चव्हाण यांनी येथे जाऊन या कार्यक्रमात सहभाग घेतला. या टीव्ही शोचे दिल्ली, मुरादाबाद येथे चित्रीकरण झाले. हा पहिला राऊंड टीव्ही शो होता. यात कुडाळच्या पाचही मुलींची टीव्ही राउंड वरून सेमी फायनलसाठी निवड करण्यात आली. सेमी फायनल राऊंड हा बॅटल मध्ये असून तिथून पुढे ही सर्व मुले ग्रँड फिनाले साठी निवड करण्यात आली. त्यानंतर ग्रैंड फिनाले मध्ये सुमन चव्हाण ही द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो ची विजेती ठरली. तसेच कनका परुळेकर, श्रुतिका परब, जानवी पावसकर व चैत्रा चव्हाण यांनी शोच्या अँड फायनल स्टॉप १५ मध्ये आपले नाव गाजवले. प्रशिक्षक प्रसाद कमतनुरे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. या सर्वांना आयोजकांच्या वतीने गौरविण्यात आले.










