सोशल मीडियाचा वापर सजगतेने करायला हवा ; ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी

वेंगुर्ले । प्रतिनिधी :

पत्रकाराला समाजभान असेल तरच तो चांगली पत्रकारिता करु शकेल. प्रिंट मीडीयाच्या काळात “वाचकांचा पत्रव्यवहारा” पुरतेच सामान्य माणसाला व्यक्त होता येत होते मात्र तुमच्या हातातल्या मोबाइलने सोशल मीडीयाच्या माध्यमातून पत्रकारितेचा आयाम वाढवीला आहे. मात्र सोशल मीडिया चा वापर सजगतेने करायला हवा असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी अणसूर पाल हायस्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात काढले.अणसूर पाल हायस्कूल अणसूर या विद्यालयाचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम अणसूर पाल शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे श्री. निलेश अटक, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रमुख पाहुणे श्री. निलेश अटक यांनी बदलत्या जीवनशैलीत समतोल आहार, व्यायाम, खेळांचे महत्व अधोरेखित करीत, विद्यार्थी जडणघडणीत सजग पालकत्वाची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी संस्थाध्यक्ष श्री. आत्माराम गावडे यांनी’चांगला माणूस व देशभक्त नागरिक बनण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. दानशूर उद्योगपती जस्मिन आर्ट प्रिंटर्सचे दादासाहेब परुळकर यांनी आपल्या जीवनातील संघर्षाच्या काळात कष्ट, श्रम, मुल्ये यावर श्रद्धा ठेवून आत्मविश्वासच्या जोरावर मिळवीलेले यशाचे महत्व विद्यार्थ्याना सांगितले