ओरोस, दि ०३ : –
जिल्ह्यासाठीची तळमळ काय असते हे आजच्या नियोजन बैठकीच्या वेळी दिसून आले, खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार डॉ निलेश राणे यांनी जिल्हावासियांच्या सेवेसाठी अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यास, मुजोरीने वागल्यास,हे काम होणार नाही असे सांगिल्यास, जनतेला हेलपाटे मारायला लावल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही व माझ्या जिल्ह्यात हे चालणार नाही असा सज्जड दम खासदार नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना भरला.
आमदार निलेश राणे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही अधिकारी तोंडावर कागद फेकून मारतात, काम होणार नाही असे सांगून अभ्यागताला चुकीच्या पद्धतीने वागवतात हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला, यावेळी बोलताना खासदार नारायण यांनी अधिकाऱ्यांनीआलेल्या प्रत्येक कामाचा निपटारा त्वरित करणे गरजेचे आहे, आम्हीही राज्य सांभाळले, त्यामुळे कारभार कसा करतात हे आम्हाला चांगले न्यात आहे काही त्रुटी असल्यास त्वरित त्याचा निपटारा करा, मात्र माझ्या जिल्ह्यातील जनतेशी कुठचाही अधिकारी मुजोरीने वागत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही, त्याची योग्य वेळी योग्य दखल घेऊन योग्य त्या पद्धतीने कारवाई करु असा इशाराच या बैठकीत दिला.
राणे कुटुंबीयांच्या हाती जिल्ह्याची सूत्रे आल्यानंतर कशा पद्धतीने जिल्ह्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी हे कुटुंब झगडते हे पुन्हा एकदा सीद्ध झाले आहे, अधिकाऱ्यांचे लाड न करता जनतेच्या कामासाठी आपली नेमणूक आहे त्यासाठी जनतेच्या विविध करांमधून आपल्याला पगार दिला जातो याचे भान ठेवून अधिकाऱ्यांनी जनतेशी सामंजस्याने, आपुलकीने वागावे यापूढे एकाही नागरिकाची तक्रार आली तर गय करणार नाही व माझ्या जिल्ह्यात हे चालणार नाही असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी याबाबतचा प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले,यावेळी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता आमदार निलेश राणे यांनी तुमची एक नाही तर अशी दहा प्रकरणे माझ्याकडेच आहेत तुमची परवानगी असेल तर ती उघड करतो अन्यथा सुधारणा करा आणि खाली बसा असा दमच भरला.










