सिंधुदुर्गनगरी, दि.३१
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी सोपविलेली कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या.जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी वार्षिक जत्रौत्सव आणि देवगड तालुक्यातील कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, कुडाळ उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे, देवगड तहसिलदार श्री ठाकुर, आंगणेवाडी आणि कुणकेश्वर विश्वस्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. मंदिर परीसरापासून किंती अंतरावर स्टॉल व दुकाने ठेवण्यात येणार आहेत तसेच स्टॉल उभारले जाणार आहेत










