सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी करणाऱ्या खलाशंकडे आधार कार्ड असणे अनिवार्य…

सिंधुदूर्ग प्रतिनिधी ३१

महाराष्ट्र राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशांकडे OR Coded आधार कार्ड (Aadhaar card) जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चट शिपिंग अॅक्टच्या, १९५८ मधील ४३५ (H) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व (सुधारीत २०२१) कलम ६ (४) नुसार भारतातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरूपी दिसेल असे रंगविणे आवश्यकच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला यासंबंधी निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी नौकेवरील प्रत्येक खलाशांने स्मार्ट कार्ड / QR Coded आधार कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक राहील. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीन च्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील, असे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त यांनी दिलेआहेत.