मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांचा सिंधुदूर्ग दौरा…

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे हे शुक्रवार ३१ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार ३१ रोजी सकाळी ११.१५ वाजता नाधवडे-वैभववाडी येथे आगमन व कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी ११.३० वा. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३७ व्या वार्षिक व्यापारी एकता मेळाव्याला उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता मोटारीने हेत- वैभववाडीकडे प्रयाण व दुपारी एक वाजता श्री गणपती मंदिर (खडकवाडी) हेत येथील श्री गणेश जयंती उत्सवाला उपस्थिती, दुपारी १.३० वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण व दुपारी २ वाजता ओमगणेशनिवास्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी २.३० वाजता मोटारीने ओरोसकडे प्रयाण व दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती, दुपारी ४.३० वाजता मोटारीने वराड-मालवणकडे प्रयाण, सायंकाळी ५ वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सरंबळ, टेंबवाडी, सोनवडेपार, वराड रस्ता येथे कर्ली खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती, सायंकाळी ६ वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण व ओमगणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव. रात्री ७.३० वाजता मोटारीने देवगडकडे प्रयाण व रात्री ८.३० वाजता बापार्डे- जुवेश्वर-कवठाळवाडी येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या २१ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थिती, रात्री ९ वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण होईल.