Category बातम्या

चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरात ४ लाखाची चोरी

सावंतवाडी, बाहेरचावाडा परिसरात राहणाऱ्या चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरातील तब्बल ४ लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे. हा प्रकार आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. सोनू कुरेशी (रा. गुजरात) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील बोर्डिंग रोड येथील विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार २ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास उघडकीस आली. निकिता गौतम तुपेरे (४०, रा. मिशन कॅम्प, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या…

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ संपन्न..

कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ रविवारी कुडाळ येथे झाली. ७ व्या एडिशनमध्ये ६० कि.मी.च्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत ४० वर्षांवरील खुल्या पुरुष गटात मुंबईचा अनुप पवार व महिला…

कोकणात होणार काजूचे पुनुरुजीवन…

ब्युरो न्यूज कोकणशाही  कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ‘सीसीआयएफ’ या संस्थेने दापोली येथे मंथन बैठक आयोजित केली होती. या संस्थेच्या पुढाकाराने काजू उत्पादक, प्रक्रियादार यांच्या समस्या समजावून घेऊन अभ्यासपूर्ण…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तर कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. भ्रष्टाचाराचे विविध आरोप झालेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. दोघांचाही राजीनामा घ्यावा म्हणून विरोधक विधानसभा आणि…

राजकोट येथे शिवपुतळा उभारण्यास प्रारंभ…

शिवपुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भाग येण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या दगडावर उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचा भाग बसवण्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून, प्रत्येक आठवड्यात हे…

धक्कादायक घटना, राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड…

ब्युरो न्यूज कोकणशाही केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत घडला. या प्रकरणी मुलींनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई झाली नाही. अखेर राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन…

कोकण सन्मान-२०२५’ पुरस्कार सोहळा ! आपला कोकण हा जगात सर्वोत्तम; ना.पालकमंत्री नितेश राणे

देवगड प्रतिनिधी ‘कोकण ‘सन्मान’ हा ‘कॉन्टेन्ट क्रिएटर्स’च्या हक्काचे व्यासपीठ आहे. तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील. त्यामुळे कॉन्टेन्ट क्रिएटर्सने कोकणची संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि कोकणचे अलौकिक सौंदर्य हे कोकणबाहेरीला जगाला दाखवत राहा. आपला कोकण हा…

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ रोडच्या बाजूला आग…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ रोडच्या बाजूला जय भवानी बस स्टॉप येथे गाडेधाव कालवंडवाडी च्या दरम्यान काल सायंकाळी उशिरा गवताला आग लागली. सदर आग येथील रस्त्यावर उभे असलेल्या तीन युवकांमुळे लागली असावी असे समजून ग्रामस्थानी निवती पोलिसांना त्यांची…

पहा कोणत्या दिवशी असणारा श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा ..

वेंगुर्ले । प्रतिनिधी : वेंगुर्ले येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात अभूतपूर्व असा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अलौकिक सोहळा होणार आहे.सिंधुदुर्ग, वेंगुर्ले, वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात तीन दिवस “किरणोत्सव” सोहळा सिंधुदुर्ग वेंगुर्ले महाराष्ट्र वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात…