सिंधुदुर्गातील परिस्थितीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे बारकाईने लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री Nitesh Rane यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि सर्व सेवा लवकरात लवकर पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून झाडे कोसळणे, घरांचे नुकसान आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे.