एखतपूर-मुंजवडी, पुणे एखतपूर-मुंजवडी, पुणे येथे सकल हिंदू समाज, भुलेश्वर उपखंड आयोजित विराट हिंदू संमेलनास मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली.








आपल्या पवित्र हिंदू धर्माच्या एकतेसाठी सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. हिंदू म्हणून आपण एकत्र आलो तर हिंदू एकतेची ही ताकद अधिक घट्ट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
आपल्या हिंदू माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी धर्मांतर विरोधी कायदा आणला आहे. राज्यातील हिंदूंच्या रक्षणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी यावेळी दिली.












