
शक्तिपीठ महामार्गाचा नवा मार्ग जाहीर; सांगलीतील 30 गावांतून जाणार रस्ता
कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 79 गावांतील सुमारे 2 हजार हेक्टरवरील क्षेत्रातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील 30 गावांमधून नवीन महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गासाठी बदललेल्या आखणीची (न्यू अलाईनमेंट) अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 6 हजार…






