Category बातम्या

काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरुपी बंद कराव्यात ; ग्रामस्थांचे साखळी उपोषण आठव्या दिवशी मागे

तिलारी धरण क्षेत्रालगत शिरंगे गाव हद्दीतील काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरुपी बंद कराव्यात, या मागणीसाठी सुरू असलेले खानयाळे ग्रामस्थांचे साखळी उपोषण आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. शिरंगे येथील कार्यरत अल्पमुदत गौण खनिज परवाने तसेच काळा दगड खाणपट्टा परवाने पुढील आदेश होईपर्यंत…

बांदा पोलिसांची कारवाई; इनोव्हा कार सह १३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त ….

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुहागर येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २५ हजारच्या दारू सह इनोव्हा कार असा मिळून १३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल बांदा येथे…

कुजलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह…

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील महापुरूष कॉम्पलेक्सच्या पाठीमागे ड्रेनेज पाईप व पाण्याची टाकी असलेल्या अडगळीच्या जागेत इमारतीला टेकून बसलेल्या स्थितीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास उघडकीस…

शिवसेना सभासद नोंदणी नियोजन बैठकीचे आयोजन

वेंगुर्ले : शिवसेना सभासद नोंदणी नियोजन बैठकीस उपस्थित सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनील मोरजकर, योगेश तेली व अन्य तालुक्यात ३१ मार्च पर्यंत नवीन एकूण ५ हजार सभासद व वेंगुर्ले शहरात १हजार सभासद नोंदणी करावयाची असून तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रमुख…

गावाची परंपरा ; या गावातील होळी असते वर्षभर उभी!

सावंतवाडी : मळगाव गावातील गावहोळीची अनोखी परंपरा होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव. मळगाव गावातील उंच सुवार्डा डोंगराच्या शिखरावर गावची मानाची पहिली होळी उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुवार्डा डोंगरा शिखराव भगवा निशाण लावून पहिली होळी…

भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांचा परशुराम उपरकर यांना इशारा! – पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरील टिकेनंतर अंकुश जाधव यांचा टोला

दुसऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून बोलणारे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे नाहीत. पोटात एक आणि ओठात एक अशीही कधी त्यांची भूमिका नसते. वास्तव आहे ते त्यांच्या स्थायी स्वभावप्रमाणे जनतेत जाऊन परखडपणे मांडतात. राजकीयदृष्टया अडगळीत पडलेले व ज्यांनी राजकीय हयात जी… जी… करत…

राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून महिलांना ई बाईक प्रदान….

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत तारकर्ली येथे राजेश्वर मंदिर नजिक डॉ. केरकर व्हिला येथे सुमारे ३५ महिलांना राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून ७५ टक्के अनुदान पद्धतीने ई बाईक प्रदान करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाजचे अध्यक्ष, माजी आमदार…

जागतिक ग्राहक दिनानिमित्त होणार जनजागृतीपर कार्यक्रम…

कणकवली कणकवली जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्ग व कणकवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्चला सकाळी १०.३० वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तसेच पालकमंत्री नितेश राणे…

शिमगोत्सवादरम्यान गर्दीमध्ये धक्का ; दोघांना बेदम मारहाण…

चिपळूण चिपळूण शहरातील पेठमाप येथे शिमगोत्सवादरम्यान गर्दीमध्ये धक्का लागल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील भेंडीनाका येथे घडली. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रोहित साळुंखे व…

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय ; कोकण रेल्वेमार्गावरील या दोन स्थानकांना मिळणार थांबे…

रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेमार्गावरील कुमठा आणि कुंदापूरा या दोन स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. कुमठा येथे एक तर कुंदापूरा येथे दोन गाड्यांना थांबे मंजूर करण्यात आले आहेत.गाडी क्रमांक २२४७६ कोइम्बतूर – हिसार एक्सप्रेस / गाडी क्रमांक २२४७५…