Category बातम्या

सरकार न्यायाच्या भूमिकेत… तरी ‘शेट्टीं’चा रस्ता रोकोचा अट्टाहास का?। रोखठोक । kokanshahi ।

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग कोकणातील आंबा–काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार हालचाली करत असताना अचानक रस्ता रोको आंदोलनाचा सूर आक्रमक का झाला, हा प्रश्न आता सर्वसामान्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. नुकसान झालेल्या बागायतदारांच्या वेदना खरी असल्या, तरी त्या…

कुडाळ येथील दैवज्ञ महिला मंडळाच्या वतीने महिला दिन साजरा

कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळ च्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुन्या म्हणून जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखिका व शिक्षिका सौ वृंदा कांबळी, तसेच वेलनेस कोच सौ…

रविंद्र चव्हाणांनी इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्या कार्यालयाला दिली भेट

सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघ निवडून आलेले इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या इन्सुली जनसंपर्क कार्यालयाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी श्री.चव्हाण यांचे…

ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ कांबळे यांचे निधन

देवगड : देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ गणपत कांबळे (वय ६७) यांचे बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरे येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. दयाळ कांबळे यांनी सुमारे ५० वर्षे पत्रकारितेत…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभावे म्हणून कार्यकर्त्यांनी श्री देव कुणकेश्वर येथे केला अभिषेक

देवगड ; शिवसेना कुडाळ–मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधीवत अभिषेक करण्यात आला.यावेळी आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या राजकीय…

कुडाळ शहरात राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानची स्थापना कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये शिवसेना…

आंबा-काजू बागायतदारांना दिलासा मिळणार! ना. नितेश राणेंच्या पुढाकाराने मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक

मुंबई : कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार स्तरावर महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून या सर्व विषयासाठी नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने आंबा व काजू बागायतदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष…

मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सिंधुदुर्ग येथे ‘ICASME-2026’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

 मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), सिंधुदुर्ग यांच्या वतीने “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲडव्हान्सेस इन सायन्स अँड मल्टिडिसिप्लिनरी इंजिनिअरिंग – ICASME-2026” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन २३ व २४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही परिषद हायब्रिड पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष…

जि प अध्यक्षपदी प्रमोद कामत यांच्या नावाचा शिक्कामोर्तब ; उपाध्यक्षपदी दादा साईल यांची निवड

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा प्रश्न अखेर सुटला. भारतीय जनता पक्षाने या मानाच्या पदासाठी प्रमोद कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या नावाला माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आज संपन्न झालेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण…

केळूस-कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरा होणार भव्य ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’

वेंगुर्ले:-नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ, केळूस-कालवीबंदर या मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’ आणि ‘२२ व्या सामाजिक नाट्य स्पर्धेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव गुरुवार, दि. १९ मार्च ते गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ या कालावधीत ‘श्री…