Category बातम्या

कुडाळात जलवाहिनी फुटल्याने या भागात पाणीपुरवठा बंद

कुडाळ शहर नळयोजनेची मुख्य जलवाहिनी गुरुवारी नक्षत्र टॉवर येथे फुटली. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील कुडाळेश्वरवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, रेल्वेस्थानक मार्ग, पोलीस ठाणे, बाजारपेठ, पानबाजार, नाडकर्णीवाडा, हॉटेल गुलमोहर ते पोस्ट कार्यालय, भैरववाडी, सत्कार पाणंद, माठेवाडा, छत्रपती शिवाजी महाराज…

कणकवलीत मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट

कणकवली : कणकवली-आचरा मार्गावरील एका दवाखान्यासमोरून दुपारच्या वेळेस ४० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. दही आणण्यासाठी गेलेल्या विद्याधर राजाराम पवार वय – ५७, ( रा. फणसवाडी, वरवडे ) हे मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी परत आल्यावर…

महावितरण अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार! वीजेचा खांब थेट चक्क मांगराच्या छप्परावर

बांदा : रोणापाल-देऊळवाडी परिसरात मुसळधार पावसात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वीजेचा खांब कोसळून थेट मांगरावर पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मांगराच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणी केलेले भात भिजल्यामुळे पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने…

रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील आंबा बागेतील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना सकाळी घडली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे हा बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी आंबा बागेतील…

अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने देवगड समुद्रात शेकडो नौका दाखल…

देवगड : अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २४ ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील…

कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती, मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा!

अरबी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे उद्यापासून कर्नाटक, गोवा आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसगारात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या दोन्हीही कमी दाबाचे क्षेत्र प्रणालीचा प्रभाव टाकत असल्यामुळे पावसाचा अंदाज…

‘वर्षा’ बंगल्यावर फडणवीस-राणे यांच्या राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची भेट पार पडली. ही भेट दिवाळीच्या निमित्ताने “सदिच्छा भेट” म्हणून झाली असली, तरी तिच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय चर्चामुळे राज्याच्या सत्तेच्या गणितात नव्या हालचालींची…

दापोली येथील व्हेल माशाच्या उलटी प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी फरार

दापोली येथील कस्टम्स विभागाने कारवाई करत पकडलेल्या कोट्यवधी किमतीच्या ४.८३३ किलोग्रॅम व्हेल माशाची उठाटी प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी हा मुंबई येथील युवराज मोरे असल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. १७ ऑक्टोबर रोजी दापोली येथील कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दापोली येथील…

दिवाळीवर पावसाचे सावट कायम ; सिंधुदुर्गात यलो अलर्ट

सिंधुदुर्ग : सावंतवाडी, वैभववाडीसह जिल्ह्याच्या अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. दिवाळीवर पावसाचे सावट कायम असून हवामान विभागाने शुक्रवार (ता. २४) पर्यत यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे हजारो भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी (ता.२०) सायंकाळी पावसाच्या…

शिवसेनेच्या ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांचा पीडित कुटुंबाला दिलासा

कुडाळ तालुक्यातील रायवाडी येथे हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे याच्या घरी शिवसेनेच्या ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, तालुका प्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख आणि माजी सरपंच सचिन गावडे यांनी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी सिद्धेश गावडे याची…