कसाल हेदुळ खोटले वांगवडे मार्गावर वाढत्या धुळीचा नागरिकांच्या आरोग्याला धोका

कोकणशाही प्रतिनिधी – श्री. राजेश हेदळकर
मालवण : कसाल हेदूळ मालवण प्रमुख रस्त्याच्या दुतर्फी बाजूला धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत रस्ते रुंदीकरण करण्याच्या नादात ठेकेदाराने कामे पूर्ण केली मात्र रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे सतत प्रदूषणाचे ढग दिसत आहेत या धुळीच्या मुळे दुचाकी स्वार व रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर तसाच आहे ठेकेदाराने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.


जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ते रुंदीकरण करण्याच्या नादात ठेकेदाराने कामे केली आहे मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावरील कामे झाल्यावर स्वच्छते अभावी उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात प्रदूषणाचे ढग दिसत आहेत. या धुळीच्या सर्वाधिक फटका रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दुचाकीस्वारांना तसेच वाहन चालकांना बसत आहे. डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, तसेच रस्त्यावरुन पूढे जाणाऱ्या वाहनाच्या मागे जर एखादे दुसरे वाहन किंवा मोटरसायकल असेल तर या रस्त्यावर सगळी कडे धूळ उडत असून त्या धुळीच्या मधूनच वाहनचलकांना गाडी पुढे हाकावी लागत आहे. व डोळ्यात धुळे चे कण जाऊन त्रास होत आहे. अशा तक्रारी वाढलेल्या असून आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावरून चालताना जनतेला सुद्धा त्रास होतो. चेहरा झाकल्या शिवाय पर्याय नाही. दरम्यान ठेकेदाराने नियमित पाण्याची फवारणी आणि तातडीची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे. कोकणशाही मालवण