Category बातम्या

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विजय शेट्टी यांना, कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे राजा सामंत यांना तर व्याधकार…

खा.नारायण राणेंचं कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सदस्यांना आश्वासन…

कोकण रेल्वेच्या सोयी सुविधा, राज्य अंतर्गत प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडविले जातील. तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातील आंबा पिकासाठी रो-रो सेवा व अन्य सुविधा प्रश्नाला न्याय देण्यासाठी लक्ष केंद्रीत करू. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहाही स्टेशनच्या…

दापोली वणंद गाव एसटी बस सेवा बंद; प्रवाशांची पायपीट ..

दापोली तालुक्यातील वणंद गावातून आसुदकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे गावातून जाणारी एसटी बस सेवाही बंद झाली आहे. तर एसटी बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांना पायपीट करत मुख्य मार्गावर जावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या हर्णे…

रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान…

नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंबस्तरावर ‘स्वच्छ माझे अंगण’ हे अभियान जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत है अभियान असून, उत्कृष्ट स्वच्छता असणाऱ्या कुटुंबांचा जि.प.कडून गौरव करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत…

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून भाजपचा सदस्य करा – मंत्री ना.नितेश राणे..

* मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आवाहन *कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ * मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व जे भाजपचे मतदार…

देवगड पाणी समस्येवर ठोस उपाययोजनेसाठी; नितेश राणे घेणार बैठक..

देवगड जामसंडे नगरपंचायत अंतर्गत सध्या अनियमित व बंद असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेबाबत नामदार नितेश राणे साहेब, मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य, यांनी उद्या, सोमवार, ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. देवगडच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नामदार नितेश राणे यांनी…

पिंगुळी राऊळ महाराज मठात चोरी; ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

कुडाळ, पिंगुळी येथील परमपूज्य संत राऊळ महाराज मठात व अण्णा महाराज मंदिरात चोरी करत अज्ञातांनी तब्बल १३ किलो चांदीसह ५.३८ लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. यात राऊळ महाराज समाधी मंदिरातून बाबांची चांदीची मूर्ती, पादुका, दत्त मूर्ती आणि चांदीचे ताट तसेच…

बिबट्याकडून श्वानांची शिकार..

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे गजबजलेल्या वस्तीत भक्षाच्या शोधत असलेल्या बिबट्याने कुत्र्याला भक्ष केले आहे. शहराला लागून जंगल भाग असून या भागात वन्य प्राणी राहतात. बिबट्याचाही वावर या ठिकाणी असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. माठेवाडा येथील डोंगराच्या मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधात…

६ जानेवारीला सिंधुदुर्ग मध्ये पत्रकार दिन होणार साजरा !

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र ६ जानेवारीला सुरू केले. यानिमित्ताने साजरा होणारा पत्रकार दिनाचा कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे,…

श्रीवर्धन शहरात मोकाट गुरढोरांचा उपद्रव..

श्रीवर्धन शहरात मोकाट गुरढोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यावर बसलेले गुरढोर हे अचानक वाहनांच्या रस्त्यात येत असल्याने वाहनधारकांसाठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहन चालवणाऱ्यांना घाबरलेले आणि सावध होऊन मार्गक्रमण करावे लागते.रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठीही हाच समस्या निर्माण होत…