Category बातम्या

वेल्डींग करताना भीषण अपघात; अग्निशमन जवानांचे धाडस ठरले जीवनदायी

रत्नागिरी : वेल्डींगचे काम सुरु असताना तोल जाऊन कामगार विद्युतभारीत तारांवर पडून नंतर कंपाऊंडच्या काटेरी तारांमध्ये अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना मिरजोळे एमआयडीसीमध्ये बुधवारी सायंकाळी ४ वाजता घडली. एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाने या कामगाराला गंभीर अवस्थेत तारांमधून खाली काढत जिल्हा रुग्णालयात…

“संरक्षक कठडा नसल्याने अपघाताचा धोका; एस. एम. हायस्कूल परिसरात नागरिकांची चिंता”

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत एस. एम. हायस्कूलजवळ हॉटेल निखिल समोरील सर्व्हिस रोडलगत ड्रेनेज व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नाला बांधण्यात आला आहे. मात्र, या नाल्यालगत संरक्षक कठडा उभारण्यात आलेला नसल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे…

“मळगाव ग्रामपंचायतीत भोंगळ कारभाराचा कळस; शिक्काच गायब!”

सावंतवाडी : मळगाव ग्रामपंचायतीचा अधिकृत शिक्का गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप मळगाव येथील रहिवासी रामचंद्र देवळी यांनी केला आहे.या भोंगळ कारभाराविरोधात त्यांनी सावंतवाडी पंचायत समितीच्या…

रेडी नागोळेवाडी शाळेला भाजपा युवा नेते विशाल परब यांची आर्थिक मदत

“भविष्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात : भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्याकडून रेडी नागोळेवाडी प्राथमिक शाळेसाठी आर्थिक मदत” रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांनी नवीन शाळा उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब…

सतर्क एसटी चालकाची धाडसी कामगिरी; सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात!

कुडाळ बसस्थानकात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका धाडसी आणि सतर्कतेच्या घटनेमुळे संभाव्य सोनसाखळी चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. नेरूर येथील एसटी चालक प्रशांत महादेव गावडे यांनी प्रसंगावधान राखत एका युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय संशयित इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.…

“मुंबईकरांचा जलप्रवास स्मार्ट बनणार; पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा”

प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रवासी जलवाहतूक अधिक आधुनिक आणि सुलभ पद्धतीने विकसित करण्याच्या उद्देशाने, ऑनलाइन तिकीट वितरण आणि विक्री प्रणाली सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक आढावा बैठक झाली.…

इंधन दरवाढीचा फटका; माथेरान टॅक्सीभाड्यात वाढ, पर्यटकांचे खिसे कापले!

नेरळ : माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या अवघड नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर रात्रंदिवस सुरू असलेल्या टॅक्सी सेवांचे भाडे तब्बल सात वर्षांनंतर वाढविण्यात आले आहे. डिझेल, पेट्रोल व सीएनजीच्या वाढत्या दरांसह वाहनांच्या देखभाल खर्चात झालेल्या वाढीमुळे नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्थेकडून प्रति सीट…

दाभोलीत पोलिसांची मध्यरात्री धाड; बेकायदेशीर बंदुकीसह एक जेरबंद

वेंगुर्ले पोलिसांना मिळालेल्या दाभोली राजापुरकरवाडी येथे वेंगुर्ले पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विवेक अर्जुन राजापूरकर (42) यांचेकडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना असलेली एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक सापडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये विवेक राजापुरकर याचे वर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी…

पिसाळलेल्या श्वानांवर कठोर कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश!

भटक्या श्वानांच्या संदर्भात आपला मागचा आदेश मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. तसेच काही नवे दिशानिर्देश दिले आहेत. नागरिकांना घातक ठरणाऱ्या पिसाळलेल्या भटक्या श्वानांना ‘दयामृत्यू’ देण्यात यावा, हा महत्त्वाचा आदेशही देण्यात आला. आम्ही गंभीर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत…

मालवणमध्ये २६ मेपासून जलपर्यटनाला ब्रेक; स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स बंद

मालवण : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१…