कोकणशाही

कोकणशाही

शाळेचा माजी विद्यार्थीच बनला विद्यार्थिनींचा ‘पॅडमॅन’; मोफत सॅनिटरी पॅडची अनोखी भेट!

अहिल्यानगर : देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालय, कर्जुने खारे येथे कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि Höganäs India Pvt. Ltd. यांच्या CSR सहकार्याने “स्वास्थ्य सखी – Women Hygiene Awareness and Health Program” हा महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न…

नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांचा स्तुत्य उपक्रम;स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या शुभहस्ते होणार भव्य वृक्षारोपण!

कुडाळ : नगरसेवक मंदार शिरसाट आणि शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून, भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांच्या शुभहस्ते कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा…

🔥 एलपीजी ग्राहकांनो, १६ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (गॅस) ग्राहकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १६ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.सर्व एलपीजी ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅसवितरकाशी संपर्क साधून अथवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी.…

बांधकाम व्यवसायिकांच्या प्रश्नांसाठी CREDAI महाराष्ट्र ठाम; प्रफुल तावरे यांचा विश्वास ।

कुडाळ : बांधकाम व्यवसायिकांना विविध स्तरांवर काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा सर्व प्रश्नांचे निराकरण CREDAI महाराष्ट्राच्या माध्यमातून निश्चितच केले जाईल, असा विश्वास CREDAI महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रफुल तावरे यांनी व्यक्त केला. CREDAI सिंधुदुर्ग यांच्या यजमानपदाखाली CREDAI महाराष्ट्र…

♟️ वेंगुर्लेत रंगणार बुद्धिबळाचा थरार; १६ ऑगस्टला जिल्हास्तरीय स्पर्धा!

वेंगुर्ले : कै. महेश परब यांच्या स्मरणार्थ “जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्टला सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे पार पडणार असून, डॉ. अजित साटेलकर मित्रमंडळ यांच्या वतीने तसेच श्रीचेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडमी यांच्या…

🤝 विशाल परबांकडून शुभेच्छांचा वर्षाव; विनेश तावडेंच्या नियुक्तीचे स्वागत

सावंतवाडी : भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेल्या काही वर्षात संघटनेसाठी सुरू असलेले कार्य लक्षात घेता पक्ष वाढीसाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री…

👨‍⚕️ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती’ करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे दोन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे प्रभारी कार्यभार रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप…

🥥 कोकणच्या परंपरेसाठी ऐतिहासिक पाऊल; अतुल काळसेकरांचा मोठा पाठपुरावा!

मालवण : महाराष्ट्राच्या समृद्ध कोकण किनारपट्टीवर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खेळल्या जाणाऱ्या ‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक व पारंपरिक खेळाला राज्य शासनाकडून ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक…

🇮🇳 युवा नेते विशाल परब यांचा अभिनव पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर स्पर्धा

सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वतीने तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी सकाळी…

📢 सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे, शंकर आडेलकर उपस्थित होते.सचिन अडसूळ यांनी यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालय,…