सतर्क एसटी चालकाची धाडसी कामगिरी; सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात!

कुडाळ बसस्थानकात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका धाडसी आणि सतर्कतेच्या घटनेमुळे संभाव्य सोनसाखळी चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. नेरूर येथील एसटी चालक प्रशांत महादेव गावडे यांनी प्रसंगावधान राखत एका युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय संशयित इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.…








