परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृहात आमदार निलेश राणेंनी आयोजित बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी, BLA आणि SIR कार्यकर्त्यांशी संवाद साधत, जनगणना प्रक्रिया, बूथनिहाय नियोजन आणि शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री. नाना आंबोले, माजी नगरसेवक श्री. अनिल कोकिळ, महिला विभागप्रमुख सौ. अनुराधा इनामदार, सहसमन्वयक श्री. उदय फणसेकर, युवासेना विभागप्रमुख श्री. सुशांत केसरकर यांच्यासह शिवडी विधानसभेतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












